शूल- भारताची पहिली इकोफ्रेंडली हायपरकार


भारताची पहिली इकोफ्रेंडली हायपरकार शूल या नावाने गुडवूड फेस्टिव्हल ऑफ स्पीड मध्ये सादर केली गेली आहे. चंकी वझीरानी यांनी तयार केली असून ते या नव्या भारतीय कंपनी वझीरानी ऑटोचे सहसंस्थापक आणि चीफ डिझायनर आहेत. त्यांनी सहारा फोर्स इंडिया फॉर्म्युला वन टीम सोबतही काम केले आहे.

शूल बनविताना हलक्या वजनाच्या चेसीसचा तसेच कार्बन फायबरचा वापर अतिशय कौशल्याने केला गेला आहे. ही कार कन्सेप्ट कार म्हणून सादर केली गेली असली तरी वर्ष अखेरी तिचा प्रोटोटाईप येईल असे समजते. या कारच्या प्रत्येक चाकात चार इलेक्ट्रिक मोटार फिट केल्या गेल्या आहेत. त्यामुळे फुल्ली इंडिपेंडन्ट टोर्क वेक्टरिंग पुरविणे शक्य झाले आहे. डिझायनरने ही कार बनविताना ० ते १०० स्पीड कन्सेप्ट ऐवजी कार हँडलिंगवर अधिक भर दिला आहे.

Leave a Comment