विम्बल्डनच्या हिरवळीचे गेली १० वर्षे रक्षण करतोय ससाणा


यंदाही दरवर्षीप्रमाणे विम्बल्डन टेनिस स्पर्धा उत्साहात आणि नेहमीच्या शानने पार पडल्या. ग्रास कोर्टवर खेळली जाणारी हि एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा. त्यामुळे येथील हिरवळ अतिशय कसोशीने वर्षभर जोपासावी लागते. विशेष म्हणजे या हिरवळीचे गेली दहा वर्षे संरक्षण करतोय एक ससाणा. रुफस नावाच्या ससाण्याची खास त्यासाठी नेमणूक केली गेली आहे. या हिरवळीचे कबुतरे फार नुकसान करतात आणि या कबुतरांना पळवून लावायची महत्वाची जबाबदारी या ससाण्यावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विम्बल्डनचे आयोजन करणारया ऑल इंग्लंड क्लबने या ससाण्याची नेमणूक केली आहे. हा ससाणा अमेरिकन हॅरीस या जातीचा आहे. सकाळी ५ ते ९ अशी त्याच्या कामाची वेळ असून तो कुठे आहे याचा ठावठिकाणा समजण्यासाठी त्याच्या शरीरात रेडीओ ट्रान्समीटर बसविला गेला आहे. या रुकुसचे २०१२ साली ट्विटर अकौंट उघडले गेले असून त्याचे १० हजार फॉलोअर आहेत. १६ आठवड्यांचा म्हणजे ४ महिन्यांचा असल्यापासून तो विम्बल्डनमध्ये सेवा देत आहे.

Leave a Comment