भारतात इंटरनेटचा स्पीड श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यापेक्षाही कमी


मुंबई – श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यापेक्षाही भारतात इंटरनेटचा स्पीड कमी असल्याचे समोर आले असून बफरींगच्या समस्येला आजही इंटरनेटची ४जी सुविधा वापरणाऱ्या भारतीय युजर्संना तोंड द्यावे लागत असल्यामुळेच भारतातील इंटरनेट स्पीड हा शेजारील श्रीलंका, म्यानमार आणि पाकिस्तान यांच्यापेक्षाही कमी आहे. ही बाब इंग्लंडस्थित इंटरनेट स्पीड टेस्टर कंपनी ओपनसिग्नलने केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे.

सध्या ४ जी नेटवर्कचे जाळे भारतात मोठ्या प्रमाणात पसरले आहे. देशात त्यानुसार ४ जी नेटवर्क अधिक प्रमाणात वापरण्यात येते. पण शेजारील श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांच्या तुलनेत भारतातील याच ४ जी नेटवर्कचा स्पीड कमी आहे. सध्या श्रीलंकेत (13.95Mbps), पाकिस्तान (13.56Mbps) आणि म्यानमारमध्ये (15.56Mbps) एवढा इंटरनेट स्पीड आहे. भारताचा इंटरनेट स्पीड या देशांच्या तुलनेत निम्माही नसल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. हे देश विकासाच्या बाबतीत भारताच्या कित्येक पटींनी पाठिमागे आहेत. पण हे देश इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जगातील सर्वात पुढारलेल्या देशांमध्ये आहेत. जगातील इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जगात अमेरिका, (16.31Mbps), इंग्लंड (23.11Mbps), आणि जपान (25.39Mbps) च्या गतीने अनुक्रमे 1,2 आणि 3 क्रमांकावर आहेत.

Leave a Comment