आजपासून फ्लिपकार्टचा ‘बिग शॉपिंग डेज’ सेल


मुंबई : ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने देखील अॅमेझॉन प्राईम डे सेलला टक्कर देण्यासाठी कंबर कसली असून फ्लिपकार्टने १६ जुलै ते १९जुलैपर्यंत ‘बिग शॉपिंग डेज’ नावाने सेल आयोजित केला असून वेगवेगळ्या कॅटेगरीमधील वस्तूंवर या सेलमध्ये सूट मिळणार आहे. ज्यामध्य़े मोबाइल फोन, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ही समावेश आहे. कंपनीने या ऑफरला सेल हो तो ऐसी अशी टॅगलाईन दिली आहे. ३६ तास अॅमेझॉनचा महासेल चालणार आहे तर फ्लिपकार्टचा सेल ८० तास चालणार आहे.

फ्लिपकार्टने अॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासोबत करार केला आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना १०% इंस्टेंट डिस्काउंट दिला जाणार आहे. याशिवाय फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआयचे ऑप्शन देखील देत आहे.

१५०० हून अधिक स्मार्टफोन मॉडल्सवर फ्लिपकार्टने सूट जाहीर केली आहे. या सेलमध्ये गुगल पिक्सल २ (१२८जीबी) तुम्हाला ४२,९९९ रुपयांना मिळणार आहे. तुम्हाला गूगल पिक्सल २ वर ३७,००० रुपयांपर्यंत बायबॅक गॅरंटीसह ३००० रुपयांची एक्सचेंज आणि ८००० रुपयांची कॅशबॅक ऑफर देखील मिळणार आहे.

कंपनी स्मार्टफोन आणि इतर अक्सेसरीजवर एक्सचेंज डिल्स आणि बायबॅक गॅरंटी देखील देत आहे. इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर ८० टक्के सूटची ऑफर देण्यात येणार आहे. याशिवाय होम अप्लायंस आणि टीव्हीवर ७० टक्के डिस्काउंट दिले जाणार आहे. या सेलमध्ये अनेक डिल्स फ्लिपकार्टने ठेवल्या आहेत. ज्याचा फायदा वेगवेगळ्या वेळी तुम्ही घेऊ शकता. जशी ‘ब्लॉकबस्टर डील’ जी प्रत्येक ८ तासानंतर रिफ्रेश होईल. ‘प्राईस क्रॅश डील’ जी प्रत्येक ८ तासानंतर रिफ्रेश होईल. ‘रश हवर डील’ जी फक्त २ तासासाठी असणार आहे. संध्याकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत ही चालेल आणि ‘फर्स्ट टाईम ऑन डिस्काउंट’ ही डील देखील असणार आहे.

Leave a Comment