फक्त किस करण्यासाठी या देशातील गल्लीत जमतात जोडपी; पण का?


आज आम्ही तुम्हाला एका अशा जागेबाबत सांगणार आहोत, जी केवळ जोडप्यांसाठी खास मानली जाते. या ठिकाणी जगभरातील जोडपी फक्त किस करण्यासाठी येतात. त्यामुळे या स्ट्रीटला किसींग स्ट्रीट असेही म्हटले जाते. वर्षभर येथे जोडप्यांची गर्दी असते पण खासकरुन व्हॅलेंटाईनला येथे तुफान गर्दी बघायला मिळते.

आपल्या सुंदरतेसाठी मेक्सिको हे शहर चांगलेच प्रसिद्ध आहे. येथे खासकरून हनीमून साजरा करण्यासाठीही लोक येतात. कारण येथे असलेले रोमॅंटिक वातावरण आणि किसींग स्ट्रीट. साइड सीन्ससाठी येथे खूप ठिकाणे आहेत पण त्यातच येथे असणाऱ्या किसींग स्ट्रीटची बातच काही वेगळी सांगितली जाते. येथे जोडपी किस करण्यासाठी एका लाईनमध्ये बघायला मिळतात.

रांगेत उभे राहून आपला किस करण्यासाठी आपला नंबर येण्याची वाट पाहणाऱ्या जोडप्यांमध्ये अशी मान्यता आहे की, या स्ट्रीटवर किस करणारे जोडपी नेहमीसाठी एकत्र राहतात. एल कॅलेजन डेल बेसो असे या गल्लीचे नाव आहे. पण गेल्या अनेकवर्षांपासून या गल्लीला किसींग स्ट्रीटच्या नावानेच ओळखले जाते.

या गल्लीच्या इतिहासाबाबत येथे राहणारे लोक सांगतात की, या गल्लीमध्ये अनेकवर्षांपूर्वी एक मुलगा आणि एक मुलगी राहत होती. डोना कार्मेन असे मुलीचे नाव होते. ती फार श्रीमंत घरातील होती. तर गरीब परिवारातील लुईस मुलगा होता. डोना वडीलांचा तिच्या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे लुईसने डोनाच्या घरासमोरच एक घर भाड्याने घेतले. हे दोघांच्याही घरच्यांना माहीत नव्हते. या गल्लीत दोघेही एकत्र वेळ घालवत होते. किस करत होते. पण डोनाच्या वडीलांना जेव्हा हे कळाले, तेव्हा त्यांनी डोनाची हत्या केली. तिच्या मृत्यूनंतर कपल्सनी येथे जमा होऊन एकमेकांना किस करून या घटनेचा निषेध नोंदवला. या ठिकाणाबाबत सांगण्यात येणाऱ्या या गोष्टीत किती सत्यता आहे हे सांगता येणे कठिण आहे. पण लाखोंच्या संख्येने जोडपी या गोष्टीने प्रेरित होऊन येथे येऊन किस करतात.

Leave a Comment