आता यूजर्सना ‘ट्रू कॉलर’ मध्ये मिळणार ही नवीन सुविधा


नवी दिल्ली : ‘ट्रू कॉलर’ या कंपनीने यूजर्ससाठी एक फीचर लॉन्च केले असून तुम्हाला आता ‘ट्रू कॉलर’ च्या माध्यमातून कॉल रेकॉर्ड करण्याचीही सुविधा मिळणार आहे. या फीचरबाबत सर्व माहिती कंपनीने त्यांच्या सपोर्ट पेजवर दिली आहे. सतत आपल्या यूजर्सना ‘ट्रू कॉलर’ वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करून देत आहेत.

कंपनीने सांगितले की, रेकॉर्डींग डिव्हाइसमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला कॉल सेव्ह होईल. ‘ट्रू कॉलर’ सर्व्हरवर हे रेकॉर्डींग सेव्ह होणार नाही. कंपनीने हेही सांगितले की, यूजर्सचे कॉल ते रीड करत नाहीत आणि त्याची प्रोसेसिंगही करत नाही. कारण कंपनीच्या प्रोसेसिंगचा सन्मान करते.

पण सर्वांनाच हे फीचर वापरता येणार नाही. कंपनीने सांगितले की, अॅन्ड्रॉइड ५.० किंवा त्याच्या पुढचे व्हर्जन जे यूजर्स वापरत असलीत तेच या फीचरचा वापर करू शकतात. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे हे फीचर अॅन्ड्रॉइड ७.१.१ नूगा वर रन होणाऱ्या डिव्हाईसला सपोर्ट करत नाही. या डिव्हाइसेसमध्ये नेक्सस, पिक्सल आणि मोटो ४ जी सारख्या डिव्हाइसचा समावेश आहे. सोबतच कंपनी यूजर्सना या फीचरचे 14 दिवसांचे फ्रि ट्रायल देत आहे. त्यानंतर हे फीचर विकत घ्यावे लागेल.

Leave a Comment