शिओमी मी मॅक्स ३ येत्या १९ जुलैला लाँच


चीनी मोबाईल उत्पादक कंपनी शिओमी त्याचा नवा स्मार्टफोन १९ जुलैला सादर करत असून त्या कार्यक्रमाची निमंत्रणे दिली गेली आहेत. हा फोन मी मॅक्स ३ नावाने येत असून भारतात तो ऑगस्टच्या मध्यास उपलब्ध होईल असे मिडिया रिपोर्ट्सवरून समजते. हा फोन दोन व्हेरीयंट मध्ये येत आहे. मॅक्स ३ आणि मॅक्स ३ प्रो अशी त्यांची नावे आहेत.

या फोनला ६.९९ इंची फुल एचडी डिस्प्ले दिला गेला असून तो ३, ४ आणि ६ रॅम मध्ये मिळेल. या फोनला इंटर्नल स्टोरेज १२८ जीबीचे आहे. रिअर कॅमेरे १२ आणि ५ एमपीचे असून फ्रंटला ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. गोल्ड आणि मॅट ब्लॅक रंगात हा फोन उपलब्ध आहे. त्याला ५४०० एमएएचची फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी दिली गेली असून एमआययुआय १० आधारित अँड्राईड ओरियो ओएस आहे. या फोनच्या ६ जीबी व्हेरीयंट ची किंमत १७४०० रुपये आहे.

Leave a Comment