नव्या ५००च्या नोटांबाबत अफवा तेज


भारतीय चलनात आलेल्या नव्या ५०० रुपयांच्या नोटांबाबत सोशल मिडीयावर जोरदार अफवा पसरविल्या जात असून त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले जात आहे. आजकाल सोशल मिडीयावर खऱ्या खोट्या बातम्यांचे पेव आहे आणि त्यातील काही वेगाने व्हायरल होतात. त्याचाच हा एक प्रकार आहे.

नव्या ५०० रु.च्या नोटांबाबत त्या खऱ्या कि खोट्या याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. ज्या नोटेत हिरवी पट्टी रिझर्व बँक गव्हर्नरच्या सही शेजारी आहे ती नोट खरी आणि ज्या नोटेत हि पट्टी म. गांधीच्या प्रतीमेजवळ आहे ती नोट बनावट असल्याची हि अफवा असून अश्या नोटा बाजारात स्वीकारल्या जात नसल्याचे सांगितले जात आहे. अनेक व्यापारी अश्या नोटा बँकांकडे परत करत असल्याची हूल हि उठविली गेली आहे. मात्र बँक अधिकाऱ्यांनी या बातमीचा इन्कार केला असून ५०० च्या बनावट नोटा बँकेकडे आल्या नसल्याचा खुलासा केला आहे.

रिझर्व बँकेनेही या संदर्भात कोणताही इशारा दिलेला नाही. काही दिवसांपूर्वी याच प्रकारे १० रु. च्या नाण्याबाबत संभ्रम पैदा केला गेला होता आणि त्यामुळे १० रु. ची नाणी बाजारात स्वीकारली जात नव्हती. मात्र रिझर्व बँकेने १० रु. ची सर्व नाणी वैध असल्याचा खुलासा केल्यावर हा प्रकार बंद झाला होता.

Leave a Comment