जिओ फोन-२ फोनमध्ये चालणार व्हॉट्सअॅप


मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक बैठकीत रिलायन्स जिओच्या दुसऱ्या फोनची घोषणा करण्यात आली आहे. जिओ वनचे जिओ फोन-२ हा फोन पुढील व्हर्जन असेल. पहिल्या जिओ फोनमध्ये नसलेल्या अनेक सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत.

रिलायन्स समूहाच्या वार्षिक बैठकीत जिओ-२ ची घोषणा करण्यात आली. यामध्ये व्हॉट्सअॅप वापरता येऊ शकते. व्हॉट्सअॅपची सुविधा याआधी लॉन्च करण्यात आलेल्या जिओच्या फोनमध्ये नव्हती. जिओ फोन-२ मध्ये आडवी स्क्रिन असेल. पण जिओ फोन-२ लॉन्च केल्यावरही पहिल्या जिओ फोनचे उत्पादन बंद केले जाणार नाही. बाजारात हे दोन्ही फोन उपलब्ध असतील.

२९९९ हजार रुपये रिलायन्स जिओ फोन-२ ची किंमत असेल. तुम्ही ५०१ रुपये देऊन तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओ फोन-२ खरेदी करु शकता. हा फोन १५ ऑगस्टपासून उपलब्ध होईल. आता फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप जिओ फोनवर मोफत वापरता येईल.

Leave a Comment