हा आहे नायकेचा सर्वात महाग बूट


जगात महागड्या वस्तूंना तोटा नाही. हिरे, दागिने, बंगले, गाड्या इतकेच काय पण दुर्मिळ मौल्यवान वस्तूंसाठी कोट्यावधीची रक्कम मोजणारे अनेक आहेत. जगप्रसिद्ध नायके या बूट निर्मिती करणाऱ्या कंपनीने बनविलेल्या एक बूट जोडाची किंमत ऐकलीय तर तोंडात बोट घातले जाणार हे नक्की. वास्तविक नायकेचे बूट महाग या कॅटेगरीमध्येच मोडतात मात्र या बुटाला तोड नाही.

या बुटाचे नाव नायके एअर इझी रेड ऑक्टोबर असे भले मोठे आहे आणि त्याची किंमत १११ कोटी म्हणजे १ अब्ज ११ कोटी रुपये अशी भलीभक्कम आहे. नावात असल्याप्रमाणे हा बूट जोड लाल रंगाचा आहे. या बुटाची इतकी प्रचंड किंमत ठेवण्यामागे एक कारण आहे. या बुटाचे डिझाईन अमेरिकन प्रसिद्ध गायक कन्ये वेस्ट याने नायकेच्या बरोबर केले आहे. एवढी एक बाब सोडली तर या बुटात विशेष काही नाही असेही समजते.

Leave a Comment