शाहरुखच पुन्हा ट्विटरचा ‘किंग’


ट्विटरवर तब्बल ३ कोटी ६० लाख फॉलोअर्सचा टप्पा बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखने गाठला आहे. शाहरुखचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत आणि शाहरुखचे नाव सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रीय राहणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये येते.

ट्विटरवर शाहरुखचे ३६ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठल्याने #SRK36Million हा हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होत आहे. भारतीय सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स हे शाहरुख खानचे आहे. गेल्याच वर्षी अमिताभ बच्चन यांना मागे टाकत शाहरुखने पहिले स्थान पटकावले. आता त्याने पुन्हा एकदा ३ कोटी ६० लाख या आकड्याने बिग बी आणि सलमान खानला मागे टाकले आहे. या तिघांच्या तुलनेत आमिर खानच्या ट्विटर फॉलोअर्सचा आकडा बराच कमी आहे.

Leave a Comment