इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आता अॅड करु शकता म्युजिक


तुम्ही आता अगदी सहज तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्युजिक अॅड करु शकता. गेल्या आठवड्यातच इंस्टाग्रामने हे फिचर युजर्ससाठी सुरु केले. अलिकडेच फेसबुकने एका रेकॉर्ड लेबलसोबत करार केला होता. त्यामुळे आता इंस्टाग्रामवर या ट्यून्स उपलब्ध होतील. सध्या हे फिचर ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, युनाइटेड किंगडम आणि युनाइटेड स्टेट्ससाठी आहे. याचा वापर स्टिकर्स आणि जीआयएफ प्रमाणेच होतो.

इंस्टाग्राम स्टोरीसाठी फोटो किंवा व्हिडिओ शूट केल्यानंतर स्क्रिन वर उजवीकडे स्माईली बटनावर टॅप करा. तिथेच दुसऱ्या लाईनवर म्युजिक बटनाचा ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप केल्यावर म्युझिक मेन्यू ओपन होईल. त्यातून तुमच्या आवडीचे म्युझिक तुम्ही सिलेक्ट करु शकता. लोकप्रिय म्युझिक येथे तुम्हाला डिफॉल्ट मिळेल. याबरोबरच एक टॅब आहे. त्याच्या मदतीने तुमच्या मूडप्रमाणे तुम्ही म्युझिक सिलेक्ट करु शकता. तुम्हाला जर दुसरे म्युझिक हवे असल्यास तुम्ही डिरेक्टरी सर्चही करु शकता. म्युझिक सिलेक्ट केल्यानंतर त्यावर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करा. यात तुम्हाला कस्टमाईज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Leave a Comment