या योगमुद्रेने आळस पळवा लांब


अनेकवेळी सकाळी अंथरुणातून उठून दिवसाच्या कामाला सुरुवात करणे अतिशय कठीण काम भासू लागते. ह्याचसाठी कारणे अनेक असू शकतात. रात्रीची अपुरी झोप, कामाचा मनावर आणि शरीरावर येत असणारा ताण, शरीरामध्ये हार्मोन्सचे असंतुलन अश्या अनेक कारणांमुळे शरीरामध्ये शैथिल्य किंवा आळस निर्माण होत असतो. कोणत्याही कामामध्ये उत्साह वाटेनासा होतो. काम करणे आवश्यक आहे हे समजत असूनही मनाची तयारी करणे अवघड वाटते. अश्या वेळी योगसाधनेमध्ये सांगितलेली विशेष मुद्रा ही समस्या दूर करू शकते.

योगसाधनेमध्ये सांगितलेली उषास मुद्रा शरीरातील आळस, शैथिल्य दूर करण्याचा प्रभावी उपाय आहे. ही मुद्रा शरीरामध्ये चैतन्य आणि उत्साह निर्माण करते. तसेच ह्या मुद्रेने शरीर आणि मन क्रियाशील बनण्यास मदत होऊन शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात. ज्या लोकांना सकाळी झोपेतून उठण्याचा आळस येतो, किंवा रात्रभर झोप होऊनही शरीर थकल्यासारखे वाटते, अश्या लोकांनी ही आपल्या हातांनी ही मुद्रा बनवून हात आपल्या डोक्याखाली ठेवावेत आणि दीर्घ श्वास घ्यावेत. ही क्रिया साधारण पाच ते सहा मिनिटे करावी.

ही मुद्रा करताना मुख आणि डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवून हातांचे पंजे वरच्या दिशेला ठेऊन उजव्या हाताच्या अंगठ्याने डाव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी ह्या दोहोंच्या मध्ये हलका दाब द्यावा. हे मुद्रा दार्रोज सकाळी उठल्यानंतर पाच ते सहा मिनिटे केल्याने शरीरामध्ये चैतन्य निर्माण होऊन मन उत्साही बनण्यास मदत होते.

Loading RSS Feed
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment