आसुसचा झेनफोन ५ झेड सादर


तैवानच्या आसुस कंपनीने त्यांचा झेनफोन ५ झेड बुधवारी सादर केला असून फ्लिपकार्टवर या फोनच्या किमतीचा खुलासा अगोदरच केला गेला होता. या फोनचे लेटेस्ट मॉडेल २९९९९ रु.पासून सुरु होत आहे. या फोनची तीन व्हेरीयंट सादर केली जात असून त्यात ६ जीबी ६४ स्टोरेजची किंमत २९९९९, ८ जीबी १२८ स्टोरेज साठी ३२९९९ आणि ८ जीबी २५६ स्टोरेजसाठी ३६९९९ अश्या किमती आहेत. या सर्व फोनची मेमरी मायक्रोकार्डच्या सहाय्याने २ टीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे.

या फोनसाठी डूअल रिअर कॅमेरा १२ आणि ८ एमपीचे असून रिअरवर फिंगरप्रिंट सेन्सरआहे. ओल्या बोटाचे ठसेही हा सेन्सर ओळखू शकणार आहे. ६.२ इची स्क्रीन, अँड्राईड ८.० ओएस अशी त्याची अन्य फिचर असून हा फोन ०.३ सेकंदात अनलॉक होतो. मिडनाईट ब्लू आणि मिटीओर सिल्व्हर रंगात हा फोन उपलब्ध आहे. मोबाईल कॉंग्रेस २०१८ मध्ये हा फोन सर्वप्रथम लाँच केला गेला होता.

Leave a Comment