महिंद्र या वर्षात भारतात आणणार जावा मोटारबाईक


महिंद्र ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी ट्विटरवरून या वर्षात भारतात जावा ब्रांड परत आणला जात असल्याचे जाहीर केले आहे. ही लोकप्रिय मोटारसायकल रॉयल एन्फिल्डचा मुकाबला करेल. साधारण दसरा दिवाळी पर्यंत जावा भारतात दाखल होईल असा तज्ञांचा अंदाज आहे.

झेक रिपब्लिकचया जावा ब्रांड बरोबर महिंद्राने क्लासिक लेजंटचा माधमातून एक्स्क्लुझिव ब्रांड लायसन्स करार केला आहे. थोडक्यात महिंद्राने क्लासिक लीजंट ची ६० टक्के स्टेक खरेदी करून कंपनीवर स्वामित्व मिळविले आहे. त्यामुळे त्यांना जावा ब्रांडचे परवाने प्राप्त झाले आहेत. जावाच्या नवीन प्रोडक्ट डिझाईन आणि इंजिनीअरिंग मध्ये महिंद्रचा इटलीतील रेसिंग टेक्निकल डेव्हलपमेंट सेंटरची मदत घेतली जाणार आहे. महिंद्रच्या पितमपूर प्रकल्पात या मोटारसायकलचे उत्पादन केले जाईल आणि त्यामुळे बाईकच्या किमती स्पर्धात्मक ठेवणे शक्य होईल असे समजते.

Leave a Comment