एअरटेलचा ग्राहकांना झटका; केली इंटरनेट डेटामध्ये कपात


नवी दिल्ली : भारती एअरटेलने ग्राहकांना झटका दिला असून १४९ आणि ३९९ रुपयांच्या प्लानच्या इंटरनेट डेटामध्ये एअरटेलने कपात केली आहे. एअरटेलच्या १४९ रुपयांच्या प्लानमध्ये आता २८ दिवसांसाठी १ जीबी डेटा प्रत्येक दिवशी देण्यात येणार आहे. तर ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी १.४ जीबी डेटा प्रत्येक दिवशी देण्यात येईल. अनलिमिटेड कॉल आणि दिवसाला १०० एसएमएसची सुविधा अजूनही कायम आहे.

रिलायन्स जिओ आणि वोडाफोनला एअरटेलने डेटामध्ये कपात केल्याचा फायदा होऊ शकतो. जिओच्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना १.५ जीबी डेटा प्रत्येक दिवशी मिळत आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. याचबरोबर अनलिमिटेड एसटीडी आणि लोकल कॉल तसंच १०० एसएमएसही फ्री मिळत आहेत.

वोडाफोनच्या ३९९ रुपयांच्या वोडाफोन रेड बेसिक प्लानमध्ये ३९९ रुपयांमध्ये ४० जीबी डेटा मिळणार आहे. याआधी याच प्लानमध्ये २० जीबी डेटा मिळत होता. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री रोमिंगची सुविधा मिळत आहे.

Leave a Comment