भारतात लाँच झाला जेव्हीसीचा ब्लुटूथ स्पीकर


नवी दिल्ली: आपला Boombox XS-XN15 पोर्टेबल स्पीकर जपानची कंपनी जेव्हीसीने भारतात लाँच केला असून हा स्पीकर वायरलेस आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. या स्पीकरची सध्याची किंमत ४,९०० एवढी असून फ्लिपकार्ट आणि क्रोमावर हा स्पीकर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

या स्पीकरला मल्टीपल कनेक्टिव्हिटी ऑप्शनसोबत ब्लुटूथ सपोर्ट उपलब्ध आहे. ब्लुटूथ सपोर्टशिवाय पेन ड्राईव्ह आणि एसडी कार्ड कनेक्ट करण्यासाठीही याच्या साईड पॅनलला सपोर्ट देण्यात आला आहे. सोबतच साईड पॅनलमध्ये मायक्रोफोन स्लॉट, एफएम रेडिओ आणि AUX कनेक्टिव्हिटी सपोर्टही देण्यात आला आहे. 1000mAhची बॅटरी स्पीकरला देण्यात आली आहे.

या स्पीकरबाबत कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही बॅटरी ५ ते ८ तास एवढ्या कालावधीपर्यंत काम करू शकते. याशीवाय 2x2W +5W RMS आऊटपूटवाला हा स्पीकर इस्टंट बेस आणि उत्कृष्ट आवाज देऊ शकेल असाही दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या स्पीकरमध्ये बिल्ट-इन इक्वलाइज़रही देण्यात आला आहे. साईड पॅनलमध्ये bass आणि trebleवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगवेगळे साऊंड कंट्रोल दिले आहेत.

एक स्ट्रीपही जेव्हीसी Boombox XS – XN15 सोबत मिळेल. ज्यामुळे हा स्पीकर तुम्ही खांद्याला किंवा गळ्यातही अडकवू शकता. स्पीकरचा डायमेंशन 291x169x182mm आहे. याशिवाय कंपनीने स्पीकरसोबत १० दिवसांची रिप्लेसमेंट गॅरेंटी आणि एक वर्षाची वॉरंटीही दिली आहे.

Leave a Comment