खुशखबर… भुशी धरण ओव्हरफ्लो !


लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी पर्यटन नगरी लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण स्थळ असणारे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले असून पाणी धरणाच्या भिंतीवरून वाहू लागले आहे. भुशी धरणाच्या पाणी पातळीत मागील चार दिवसांपासून सलग पडत असलेल्या पावसामुळे वेगाने वाढ होत होती. तो ओव्हरफ्लो केव्हा होतो हे पाहणे केवळ बाकी होते. अखेर धरणातील पाणी मंगळवारी सायंकाळी धरणाच्या सांडव्याला लागल्यावर या सांडव्यावर लावण्यात आलेल्या फळ्या बाजूला करण्यात आल्या आणि धरणातील पाणी फेसळत पायऱ्यांवरून वाहू लागले. भुशी धरणासोबतच पर्यटकांचे आकर्षण असणारे तुंगार्ली धरण, लोणावळा धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मात्र, यातही भुशी धरणाबाबत येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये एक वेगळेच आकर्षक असते.

Leave a Comment