गोड रसाळ लीची आहे बहुगुणकारी


बाजारात आता आंब्याचा मोसम संपण्याच्या मार्गावर असतानाच गोड रसाळ लीची दाखल झाली आहे. उन्हाळ्यात आंब्यानंतर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारे हे फळ आकाराने लहान असले तर तब्येतीसाठी महान आहे. महाराष्ट्रात हे फळ शहरी भागापुरते मर्यादित असले तरी आता छोट्या शहरातूनही लीची मिळू लागल्या आहेत. या फळाचे फायदे अनेक आहेत आणि त्यामुळे सिझन मध्ये ती आवर्जून खायला हवीत.

लीची मध्ये अँटीऑक्सिडन्ट भरपूर प्रमाणात आहेतच पण बी कॉम्प्लेक्सचा साठा भरपूर आहे. त्यात फायटोन्युट्रीअंट, फ्वेवनॉइड आणि बी व्हिटामिन असल्याने चयापचय क्रिया सुधारते आणि पोटाचे बरेचसे विकार नियंत्रणात येतात. या फळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे गरजेचे आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.


अँटीऑक्सिडन्टचे प्रमाण यात भरपूर असल्याने ते कॅन्सररोधी काम करते तसेच शरीराला अनेक प्रकारच्या स्ट्रेसपासून मुक्ती देते. कॅन्सरला कारणीभूत असलेल्या पेशीविरोधात हे फळ उपयुक्त आहे. यात अँटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याने व्हायरल संसर्गापासून संरक्षण मिळते, श्वसनमार्गाचे आरोग्य चांगले राहते आणि सर्दी, फ्यु पासून बचाव होतो. या फळाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित होतो आणि शरीरातील द्रवाचे प्रमाण योग्य राखले जाते. या फळाच्या सेवनाने रक्तवाहिन्या आकुंचन पावून अरुंद होण्यास अटकाव होतो.

Leave a Comment