ही आहे यूट्यूबवरील सर्वांची लाडकी शेफ, वय १०६


यू ट्यूब हा चॅनल, त्यावरील व्हिडीयोज करिता अतिशय लोकप्रिय आहे. विषय कोणता ही असो, त्याच्याशी संबंधित व्हिडियो यू ट्यूबवर नाही असे, होत नाही. ह्या यू ट्यूब व्हिडीयोजच्या द्वारे तुम्ही अनेक गोष्टी जाणून घेऊ शकता. फिटनेस, आधुनिक तंत्रज्ञान, इतिहास, सामन्य ज्ञान, घरगुती टिप्स, ह्या आणि अश्या असंख्य विषयांवर यू ट्यूबवर व्हिडीयोज उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे अनेकजण पाककलेचे व्हिडियो देखील यू ट्यूबवर उपलोड करीत असतात. त्यामुळे तऱ्हे-तऱ्हेचे देशी विदेशी पदार्थ बनविण्याची पद्धत आपल्याला घरबसल्या पाहायला मिळते. हे व्हिडीयोज खूप लोकप्रियही होत असतात. अश्याच प्रकारचे पाककलेचे अनेक व्हिडियो यू ट्युबवर अपलोड करणाऱ्या मस्तानम्मा सर्वांच्या लाडक्या शेफ आहेत. १०६ वर्षे वय असलेल्या मस्तानम्मा जगातील सर्वात वयस्क ‘यू ट्युबर’ आहेत.

आपल्या साध्याच, आपण रुचकर रेसिपीज मुळे आजवर मस्तानम्मांनी लाखो दर्शकांची मने जिंकून घेतली आहेत. त्याच्या ‘कंट्री फुड्स’ ह्या यू ट्यूबवरील चॅनलचे ८४७,००० ‘सबस्क्रायबर्स’ असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. मूळच्या आंध्र प्रदेशातील गुडूवडा प्रांतातील निवासी असणाऱ्या मस्तानम्मांचे लहान वयातच लग्न झाले होते. मात्र वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षीच त्यांना वैधव्य आले. पण त्यांचे दुर्दैव इथेच संपले नाही. त्यांच्या पाच मुलांपैकी चार मुले टायफॉईड होऊन वारली. इतके दुःख झेलूनही मस्तानम्मा खंबीर राहिल्या. तांदळाच्या शेतांमध्ये रोजंदारी वर कामे करून त्यांनी आपला चरितार्थ चालविण्यास सुरुवात केली.

वयाच्या १०५व्या वर्षीपर्यंत देखील मस्तनाम्मा सतत कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यग्र असत. पाककौशल्यामध्ये ही मस्तानममा निपुण होत्याच. त्यावेळी त्यांच्या नातवाने, त्यांचे पाककौशल्य यू ट्यूबच्या माध्यमातून जगभरामध्ये प्रसिद्ध करण्याची कल्पना त्यांचासमोर मांडली असता, त्यांनी ही मोठ्या उत्साहाने सहमती दर्शविली. अश्या रीतीने मस्तानम्मांच्या यू ट्यूबवरील यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली. मोकळ्या रानामध्ये, चुलीवर बनविलेले त्यांचे निरनिराळे पदार्थ दर्शकांनी खूपच पसंत केले. मस्तानम्मांच्या सर्वच व्हिडीयोज मध्ये त्या सर्व परिवारासाठी पदार्थ बनविताना दिसतात. व्हिडियोच्या शेवटी परिवारातील सर्व सदस्य आणि शेतावर कामे करणारे सर्वजण मस्तानम्मांच्या हातच्या रुचकर भोजनाचा आस्वाद घेताना ही दिसतात. मस्तानम्मांचा मनमोकळा स्वभाव आणि त्यांचा हजरजबाबीपणा, ह्या मुळे त्या सर्वात वयस्क आणि अतिशय लोकप्रिय यू ट्युबर ठरल्या आहेत.

Leave a Comment