योग आणि आपल्या किडनीचे आरोग्य


योग हा शरीर आणि मन, चित्त, मेंदू ह्यांकरीताही उत्तम व्यायाम असल्याचे म्हटले जाते. नियमित केलेल्या योगसाधनेमुळे शरीर सर्व प्रकारच्या हालचाली करण्यासाठी बलवान राहतेच, पण त्याशिवाय शरीरातील नर्व्हस सिस्टम, पचन क्रिया, मनाची एकाग्रता ह्यावरही योगसाधनेचा सकारात्मक परिणाम होत असतो. त्याच बरोबर निरनिराळ्या व्याधींमध्येही योगामुळे लाभ होताना दिसून येतो. उदाहरणार्थ किडनीशी निगडीत व्याधींमध्ये योग साधनेमुळे फरक दिसून आला आहे.

त्याचप्रमाणे योगसाधनेमुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना किडनीचे विकार असल्याची शक्यता जास्त असते. मात्र नियमित योगसाधना केल्यामुळे ब्लड शुगर, उच्चरक्तदाब, आणि लिपीडस् नियंत्रणात राहण्यास मदत होते. ब्लड शुगर नियंत्रणात राहिल्याने मधुमेहींना किडनीचे विकार होण्याची शक्यता कमी उद्भवते. त्यामुळे मधुमेहींनी नियमित योगसाधना करावी. तसेच हायपरटेन्शन किंवा उच्चरक्तदाब हे देखील किडनी निकामी होण्यामागे असलेल्या मुख्य कारणांपैकी एक आहे. योगसाधनेमुळे शरीर आणि मेंदू ह्या दोहोंना निरोगी ठेऊन रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच नियमित योगसाधना करणाऱ्यांचे हार्ट रेट, ( हृदयाच्या ठोक्यांची गती ), कोलेस्टेरोल इत्यादी देखील नियंत्रणामध्ये राहतात.

क्रोनिक किडनी डिसीजने ग्रस्त रुग्ण क्वचित नैराश्याचा सामना करीत असतात. पण त्यांना अँटी डीप्रेसंट औषधे देणे, त्यांच्या कमकुवत शारीरिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. अश्यावेळी योगसाधना आणि मेडीटेशनच्या मदतीने रुग्णाचे नैराश्य दूर करण्यास मदत होते. अनेक वेळी क्रोनिक किडनी डिसीज असलेया रुग्णांच्या बाबतीत चयापचय क्रिया कमकुवत झालेली असते, त्यामुळे अश्या रुग्णांना सांधेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. नियमित योगासने केल्याने चयापचय क्रिया ठीक होऊन सांधेदुखी पुष्कळ प्रमाणामध्ये कमी होताना दिसून येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment