मुकेश अंबानींच्या संपत्तीत दोन दिवसांत ९४०० कोटींची वाढ


मुंबई : या वर्षीदेखील रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा पगार वाढलेला नाही. पण त्यांच्या संपत्तीत मागील दोन दिवसांत ९४०० कोटींची वाढ झाली आणि त्यांनी जगातील अनेक अब्जाधीशांना मागे टाकले आहे. जागतिक पातळीवर त्यांनी अनोखा विक्रम केला आहे. मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत १५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. वॉलमार्टच्या जिम वॉल्टन आणि रॉब वॉल्टॉन यांना त्यांनी मागे टाकत हा विक्रम नोंदवला आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सच्या निर्देशांकनुसार त्यांच्या मालमत्तेत मोठी वाढ झाली आहे. अलीबाबाचे जॅक मा यांच्या मागे मुकेश अंबानी आहेत.

ब्लूमबर्ग इंडेक्सच्या मते, १९ जून रोजी अंबानींची एकूण संपत्ती २.७५ लाख कोटी रुपये होती. १४ व्या स्थानी असलेल्या जॅक माच्या एकूण संपत्तीमध्ये ३.११ लाख कोटींची वाढ झाली. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडियाच्या शेअर्सची एकूण संपत्ती दोन दिवसांत ९४०० कोटींनी वाढली असल्यामुळे २१ जून रोजी त्यांची एकूण संपती ४१.९ अब्ज (२.८४ लाख कोटी) गेली आणि श्रीमंत लोकांच्या यादीत १५ स्थानावर आले आहेत.

मुकेश अंबानी आपल्या मालमत्तेतून ५६.६ दशलक्ष बॅरल कच्चे तेल विकत घेऊ शकतात आणि १० दशलक्ष ग्रॅम सोने विकत घेऊ शकतात असे या अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment