आता १२९ रुपयांमध्ये मिळणार अॅमेझॉन प्राईमची सुविधा


मुंबई : अॅमेझॉन इंडियाने युजर्ससाठी सातत्याने वाढत असलेल्या स्पर्धांमध्ये जबरदस्त ऑफर सादर केली आहे. अॅमेझॉन प्राईमने याच्याअंतर्गत नविन मासिक अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन भारतीय बाजारपेठेमध्ये सादर केले आहे. आता नव्या स्कीममध्ये नॉन-प्राईम सब्सक्रायबर अॅमेझॉन प्राईमच्या सर्व्हिसअंतर्गत १२९ रुपयांमध्ये महिन्याभराचे सब्सक्रिप्शन घेऊ शकतात. ९९९ रुपयांमध्ये याचे वर्षभराचे सब्सक्रिप्शन मिळेल.

कंपनीकडून यापूर्वी फक्त वर्षभराचे सब्सक्रिप्शन मिळत होते. पण युजर्स आता महिन्याभराचे सब्सक्रिप्शन घेऊ शकतात. कंपनीने याबद्दल सांगितले की, युजर्संना आमच्याकडून दर महिन्याला मेंबरशिपची रिन्यू डेटने तीन वर्षापूर्वीची माहिती मिळेल. जर युजर्सने यात पुढच्या महिन्यासाठी मेंबरशिप सुरू ठेऊ शकतात किंवा रद्दही करु शकतात. तुम्ही जर वर्षभरासाठी मेंबरशिप घेऊ इच्छित असाल तर नेट बॅंकींग किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करु शकता.

प्रत्येक महिन्यात अॅमेझॉनकडून ऑफरमध्ये युजर्संना प्राईम व्हिडिओ आणि अॅमेझॉन म्युझिकसाठी फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. देशात जुलै २०१६ पासून अॅमेझॉन प्राईम सर्व्हिसची सुरुवात झाली. याची किंमत सुरुवातीला ४९९ रुपये होती. ही सुविधा घेणाऱ्या युजरला वार्षिक प्लॅनचा लाभ मिळत होता. लॉन्चिंगनंतर याची किंमत ९९९ रुपये झाली.

Leave a Comment