गोव्यातील २४ असुरक्षित ठिकाणे ‘नोन-सेल्फी’ झोन


पणजी: दिवसेंदिवस किनारपट्टीवरील दगडांवर राहून सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमावणचे प्रकार वाढत चालले असून सरकार नियुक्त जीवरक्षक एजन्सी ‘दृष्टी मरीन’ने ओळखल्या गेलेल्या २४ असुरक्षित सेल्फी ठिकाणांवर हे सर्व थांबवण्यासाठी ‘नो-सेल्फी’ झोनचे साइनबोर्ड लावण्याचे ठरविले आहे.

उत्तर गोव्यातील बागा नदी, दोनापावला जेटी, सिकेरी किल्ला, हणजूण, वागातोर, मोरजी, आश्वे, हरमल, केरी व बांबोळी आणि शिरडाव तर दक्षिणमधील आंगोद, बोगमालो, होलांत, बायणा, जपानिझ बाग, बेतुळ, कणांगाइणी, पालोले, खोला, काबो द रामा, पोळे, गालजिबाग, ताळपोणा व राजबाग या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. ‘नो-सेल्फी’ संकेत सूचक या सर्व ठिकाणांवर लावण्याचा विचार ‘दृष्टी मरीन’ने केला आहे.

याबाबत माहिती देताना दृष्टी मरीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर म्हणाले, काही ठिकाणांवर असलेले साइनबोर्ड अपग्रेड करण्यात आले असून झेंड्यांवर सचित्र निर्देश (पिक्टोरियल इनस्ट्रक्शन), आपातकालीन टोल फ्री क्रमांक व काय करावे आणि काय करू नये या बद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

१ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना व प्रवाशांना दृष्टी मरीनने समुद्रात न जाण्याचे आदेश जारी केलेल्या मार्गदर्शक इशारावजा सूचनाद्वारे कळवण्यात आले आहे. कारण समुद्र व वाऱ्याचे वातावरण या दिवसात पोहण्यासाठी व पाण्यातील मनोरंजक उपक्रमांसाठी उपयुक्त नसते. सर्व ‘नॉन-स्विम’ ठिकाणांवर लाल झेंडे रोवण्यात आले आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment