सुरु झाले व्हॉट्सअॅपचे ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फीचर


मुंबई: गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपचे ग्रुप व्हिडीओ कॉलिंग हे फीचर अॅन्ड्रॉईड आणि आयओएसच्या काही युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले होत. पण हे फीचर आता व्हॉट्सअॅपच्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. या फीचरबाबतची माहिती व्हॉट्सअॅपच्या अॅन्युअल डेव्हलपर कॉन्फरन्सदरम्यान देण्यात आली होती.

WhatsApp V.2.18.189 व्हर्जनवर ग्रुप कॉलिगंचे हे नवे फीचर उपलब्ध आहे. नवीन फीचर असल्याने अनेकांना हे फीचर हाताळताना थोडी अडचण होऊ शकते. व्हॉट्सअॅपर ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर वापरण्यासाठी सर्वात आधी ज्यांना व्हिडीओ कॉल करायचे आहे, त्या युजरचं चॅट ओपन करा. त्यानंतर व्हिडीओ कॉलिंग बटनावर क्लिक करा. त्यानंतर व्हिडीओ कॉल करा आणि यूजर कॉल रिसिव्ह करेपर्यंत वाट पाहा. एकदा पहिल्या युजरने कॉल रिसिव्ह केल्यानंतर तुम्ही इतर दोन युजर्सना कॉल करु शकता. यासाठी तुम्हाला अॅड कॉन्टॅक्टवर क्लिक करावे लागणार आहे नाव सर्च करून तुम्हाला कॉल करायचे आहे त्या युजरचं नाव अॅड करावे लागेल. तिसऱ्या आणि चौथ्या युजरला जोडल्यानंतर त्याबाबतचे नोटिफिकेशन इतर दोन युजर्सना जाईल.

Leave a Comment