परदेशात ९०० कोटींची गुंतवणूक करणार औरंगाबादची ‘व्हेरॉक’


औरंगाबाद – आता देशांतर्गत आणि परदेशातील विस्तार आणि अन्य उद्योगांना टेकओव्हर करण्यासाठी औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीतील एक महत्त्वाची कंपनी अशी ओळख असलेला व्हेरॉक समूह परदेशात सुमारे ९०० कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याची चर्चा सध्या उद्योग वर्तुळात सुरू आहे.

गेल्या काही वर्षांत व्हेरॉक औद्योगिक समूहाने जगाच्या पाठीवर आपली पावले रोवली आहेत. दहापेक्षा अधिक व्हेरॉकच्या कंपन्या असून येथेच कंपनीची मुख्य उत्पादनेही तयार होतात. ऑटो वाहनांचे सुटे भाग पुरविणारी आणि वाहनांचे लायसंस सिस्टीम तयार करणारी अग्रगण्य कंपनी असलेल्या व्हेरॉक भारताबरोबर परदेशात झेप घेत आहे.

व्हेरॉक उद्योगाचा विस्तार २०१८ मध्ये व्हेरॉक मोरोक्को, ब्राझिल या देशांमध्ये करणार आहे. सुमारे ३३ मिलियन युरो मोरोक्कोत, तर सुमारे ३० मिलियन युरोची गुंतवणूक ब्राझिलमध्ये करण्यात येणार आहे. आगामी तीन वर्षांत ही गुंतवणूक केली जाणार असून, यातून पुढील ३ ते ४ वर्षांत १०० मिलियन युरोचे उत्पन्न मिळेल,अशी माहिती समोर येत आहे.

Leave a Comment