
नवी दिल्ली – भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते राजीनाम्यानंतर ऑक्टोबर महिन्यांत पुन्हा अमेरिकेला परतणार आहेत. त्यांचे कुटुंब अमेरिकेत असून आपण हा राजीनामा कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी दिल्याचे सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा राजीनामा
अरुण जेटलींनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये याबाबत सांगितले की, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी काही दिवसांपूर्वी माझ्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. आपल्याला पुन्हा अमेरिकेत आपल्या घरी जाण्याची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले होते. माझे यासाठी कारण वैयक्तिक असले तरी ते माझ्यासाठी खुपच महत्वाचे आहे. आपल्याला हा निर्णय काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा दबाव असल्याने घ्यावा लागत आहे. भारतातून त्यासाठी जाण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नसल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. मी देखील त्यांची अडचण लक्षात घेता त्यांच्या निर्णयाशी सहमत आहे.
सुब्रमण्यम यांचा मुख्य आर्थिक सल्लागारपदाचा कार्यकाळ नियुक्तीच्या तीन वर्षांनंतर १६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपला होता. त्यांना त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत एक वर्षांसाठी त्यांची मुदत वाढवण्यात आली होती. सुब्रमण्यम हे देशाच्या भविष्यासाठी उत्कृष्ट धोरणकर्ते असल्याचे मत अरुण जेटली यांनी त्यांची नियुक्ती करताना व्यक्त केले होते.
