व्होडाफोनची दोन नवीन रिचार्ज पॅकची घोषणा


मुंबई : व्होडाफोनने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता दोन नवीन प्लान बाजारात आणले आहेत. त्यानुसार दिवसाला ३ जीबी डेटा मिळणार आहे. ५११ रुपये आणि ५६९ रुपयांचे दोन लाँग टर्म रिचार्ज पॅक व्होडाफोनने लाँच केले आहेत. त्यात अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हाइस कॉलचा समावेश आहे.

ग्राहकांना ५११ रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस आणि २ जीबी ३ जी/४जी डेटा मिळणार आहे. ८४ दिवसांसाठी असलेल्या या रिचार्ज पॅकमध्ये एकूण १६८ जीबी डेटा मिळेल तर ५६९ रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हाइस कॉलसह एसएमएस आणि ३ जीबी ३ जी/४जी डेटा मिळणार आहे. यात ग्राहकांना एकूण २५२ जीबी डेटा वापरता येईल.

Loading RSS Feed

Leave a Comment