ई-कॉमर्स क्षेत्रात गुगलची एंट्री


बीजिंग : सध्या मोठ्या प्रमाणात ई-कॉमर्स अर्थात ऑनलाइन खरेदीत वाढ होत असून आता गुगलने हेच लक्षात घेत आपले आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे. गुगल चीनमध्ये आपले वर्चस्व आणखीन मजबूत करण्यासाठी ई-कॉमर्स व्यापारात उतरणार आहे. यासाठी गुगल चीनमधील ई-कॉमर्स कंपनी जेडी डॉट कॉममध्ये ५५ कोटी डॉलर्स गुंतवणार आहे.

गुगुलच्या हवाल्याने सीएनबीसीने सांगितले की, गुगल भागीदारी अंतर्गत जेडी डॉट कॉममध्ये ५५ कोटी डॉलर्स गुंतवणार आहे. गुगलला या अंतर्गत जेडी डॉट कॉमचे २.७ कोटींहून अधिक क्लास ए साधारण शेअर्स २०.२९ डॉलर्स प्रति शेअरच्या मुल्याने मिळणार आहेत. चांगली यंत्रणा विकसित करण्यासाठी गुगल आणि जेडी डॉट कॉम या दोन्ही कंपन्या पार्टनरशिपमध्ये काम करणार असल्यामुळे खरेदीचा अनुभव खूपच चांगला होईल आणि दक्षिण-पूर्व आशियासोबत इतर बाजारातील स्पर्धा कमी होईल.

ई-कॉमर्स क्षेत्रात आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवण्यास गुगल उत्सुक असून ग्राहक गुगल सर्विसच्या माध्यमातून फ्रान्सच्या पार्टनरशिपने आपले स्मार्टफोन्स, टॅबलेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑर्डर करु शकतात. गुगलचे चीफ बिझनेस ऑफिसर फिलिप शेनडलर यांनी सांगितले की, आम्ही जेडी.कॉमसोबत पार्टनरशिपने व्यवसाय करण्यास खूपच उत्साही आहोत.

Leave a Comment