अंमलीपदार्थ आणि जुगाराच्या व्यसनाएवढेच व्हिडिओ गेम्स खेळणे धोकादायक!


मुंबई: मोबाईलवर व्हिडिओ गेम्स खेळणे हे कोकेन आणि जुगाराच्या व्यसनाएवढेच धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य परिषदेने म्हटले आहे. व्हिडिओ गेम्सचा अतिवापर हा मानसिक रोग असल्याचे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस या नियतकालिकाच्या अकराव्या आवृत्तीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

व्हिडिओ गेम्सपासून दूर राहु न शकणे, खेळ मध्येच थांबवता न येणे, गेम खेळत असताना इतर कशाचेही भान न राहणे अशी या मानसिक रोगाची लक्षण असून साधारण वर्षभर ही लक्षणे दिसल्यास मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे जागतिक आरोग्य परिषदेने म्हटले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment