
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आणखी एक दमदार प्लॅन आणला असून हा प्लॅन एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांसाठी असून १६८ दिवस म्हणजे पाच महिन्यांहून जास्त इतकी वैधता ५९७ रुपयांच्या या प्लॅनमध्ये आहे. ग्राहकांना या प्लॅनमध्ये १० जीबी हायस्पीड इंटरनेट डेटा देण्यात येत असून या डेटाची वैधता १६८ दिवस असेल. हा प्लॅन सध्या काही ठरावीक सर्कलमध्ये लागू करण्यात आला आहे, पण हा प्लॅन येत्या काही दिवसांमध्ये सर्व सर्कलमध्ये लागू केला जाणार आहे.
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आणला आणखी एक दमदार प्लॅन
१० जीबी हायस्पीड इंटरनेटची मर्यादा संपल्यानंतरही इंटरनेट अमर्यादित कालावधीसाठी सुरूच राहणार आहे. पण मर्यादा संपल्यानंतर १२८ kbps या स्पीडने ग्राहकांना इंटरनेट वापरता येणार आहे. एअरटेलच्या सर्व अॅप्सचे सबस्क्रिप्श या प्लॅनमध्ये मोफत करता येईल, तसेच रोमिंगमध्येही अमर्यादित कॉलिंग, रोजच्या वापरासाठी १०० एसएमएस देण्यात येतील.
