
चीनी कंपनीने कॉमिओ सी वन नावाने नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला असून फेशिअल रेक्ग्नीशन फिचरसह हा फोन डूअल सीम, ४ जी व्होल्ट सपोर्ट करणारा आहे. या फोनची किंमत ५५९९ रु. असून या फोनवर १ वर्ष १०० दिवसांची वॉरंटी, वन टाईम स्क्रीन ब्रोकेज वॉरंटी, ३० दिवसांसाठी रिप्लेसमेंट ऑफर, १ वर्षात परत केल्यास नवीन फोन खरेदीवर ४० टक्के सवलत अश्या अनेक सवलती दिल्या गेल्या आहेत. रिलायंस जीओने हा फोन खरेदी केल्यास २२०० रु. कॅशबॅक देऊ केला आहे.
कॉमिओचा सी वन स्मार्टफोन भारतात आला
या फोनला ५ इंची डिस्प्ले स्पिलीट स्क्रीन फिचरसह दिला गेला आहे. फोनला १.५ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज असून मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ते १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. ऑटोफोकस सह ८ एमपीचा रिअर कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा ५ एमपीचा असून फेशिअल रेक्ग्नीशन सपोर्ट करतो. या फोन साठी अँड्राईड ओरिओ ८.१ ओएस दिली गेली आहे.
