यावर्षाच्या अखेरीस येणार पतंजलीची जीन्स


मागच्या काही वर्षांपासून योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली जीन्सची चर्चा असून ही जीन्स नेमकी कधी दाखल होणार त्यावरचा पडदा आता पडण्याची शक्यता असून कंपनीने नुकतेच ही जीन्स केव्हा दाखल होणार याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे तुम्हाला ही जीन्स लवकरच घालता येईल. कंपनी या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपला कापड उद्योग सुरु करेल असे म्हटले जात आहे. पतंजलीचे कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्णन यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीची माहिती दिली आहे.

परिधान या नावाने पतंजली आपला कपड्यांचा ब्रँड लाँच करेल. नोएडामध्ये हा कपड्यांचा उद्योग असेल. एक टीम यासाठी तयार करण्यात आली असून कपड्यांची निर्मिती तयार करणारी कंपनी वेगळी (थर्ड पार्टी) असेल. आपल्या कपड्यांचे १०० शोरुम सुरुवातीला पतंजलि सुरु करेल असेही सांगण्यात आले आहे. जवळपास ३००० वेगवेगळे कपडे परिधान या ब्रँडअंतर्गत उपलब्ध होतील. ज्यामध्ये मुलांचे कपडे, योगाचे कपडे, स्पोर्टसवेअर, टोपी, चपला, टॉवेल, बेडशीट यांसारख्या गोष्टींचा समावेश असेल. याशिवायही अनेक गोष्टी उपलब्ध होतील.

Leave a Comment