सॅमसंग सर्वप्रथम आणणार फोल्डेबल स्मार्टफोन


स्मार्टफोन च्या डिझाईनमध्ये आजकालच्या काळात अनेक बदल होत आहेत. कुणी बेजललेस, कुणी फुल स्क्रीन डिस्प्लेचे फोन बाजारात आणले आहेत मात्र अद्यापि फोल्डेबल स्मार्टफोन आलेला नसून हा मान सॅमसंग ला मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. द. कोरियातील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोन तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचली असून या फोन साठीची सुटे भाग नोव्हेंबर पासून मिळू लागल्यावर फोनची असेम्बल प्रक्रिया सुरु केली जात आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एक्स या नावाने हा फोन २०१९ च्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्ये सादर केला जाईल असे समजते. या फोनचा प्रोटोटाईप सीएसएस २०१९ मध्ये अमेरिका करिअरसह होणाऱ्या खासगी बैठकीत दाखविला जाईल असेही सांगितले जात आहे. हा कंपनीचा एस सिरीज फ्लॅगशिप फोन असेल असेही समजते. हा फोन ७.३ इंची डिस्प्ले पॅनलसह येईल आणि त्याची किंमत साधारण १ लाख २५ हजार रु. असेल असा अंदाज जाणकार वर्तवित आहेत.

Leave a Comment