आता थेट तुमच्या व्हॉट्सअॅपवर बँकेचे मेसेज


मुंबई : तुमच्या फोनवर बँकेत पैसे जमा केल्यावर, पैसे काढल्यावर किंवा बँकेशी संबंधित इतर कुठलेही काम केल्यावर तात्काळ एक मेसेज येतो. कुठल्याही प्रकारचा बँकिंग व्यवहार तुम्ही केल्यावर बँकेतर्फे तुम्हाला एक मेसेज पाठवण्यात येतो. पण आता बँकेकडून येणारे हे एसएमएस आता थेट तुमच्या व्हॉट्सअॅपवर येणार आहेत.

याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, एका नव्या सेवेचे टेस्टिंग देशातील टॉप ५ बँका करत असून त्या अंतर्गत व्यवहारासंबंधी मेसेजेस ग्राहकांना थेट त्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवण्यात येणार आहेत. यामुळे बँकेतुन पैसे काढल्यावर, जमा केल्यावर किंवा इतर बँकेचे व्यवहार केल्यावर ग्राहकांना मेसेज ऐवजी व्हॉट्सअॅप मेसेज पाठवण्यात येणार आहेत. यासाठी ग्राहकांना आपल्या बँकेकडे रजिस्टर्ड व्हॉट्सअॅप फोन नंबर द्यावा लागणार आहे.

तुम्ही व्हॉट्सअॅप फोन नंबर रजिस्टर्ड केल्यानंतर तुमच्या बँकिंग संबंधित व्यवहाराची माहिती व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. यासोबतच बँकेतर्फ व्हॉट्सअॅप हेल्पलाईन नंबरही सुरु केली जाऊ शकते. ज्याच्या माध्यमातून ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतात. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, इंड्सइंड बँक आणि अॅक्सिस बँक ही सुविधा देण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहेत.

Leave a Comment