शाओमीचा रेडमी ६ भारतात लॉन्च


नवी दिल्ली : आपला बजेट स्मार्टफोन रेडमी ६ आणि रेडमी ६ A फोन मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने भारतात लॉन्च केला आहे. कंपनीतर्फे गेल्यावर्षी लॉन्च करण्यात आलेल्या रेडमी ५ चा रेडमी ६ अपग्रेड व्हेरिएंट असल्याचे बोलले जात आहे. अनेक फिचर्स या नव्या फोनमध्ये असून ज्यामध्ये फेस अनलॉक, १८:९ डिस्प्ले, रिअर फिंगरप्रिंट सेंसर आणि ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे.

रेडमी ६ हा फोन अँड्राईड ८.१ वर चालतो. ५.४५ इंचाची ७२०X१४४० पिक्सल रिझॉल्युशन असलेला डिस्प्ले या फोनमध्ये देण्यात आला आहे. तसेच २ गिगाहर्ट्सचा ऑक्टा-कोअर हिलिओ पी २२ प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन ३जीबी आणि ४जीबी रॅम असे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. १५ जून रोजी सकाळी १० वाजता रेडमी ६ या फोनचा पहिला सेल सुरु होणार आहे.

Leave a Comment