हुवाईचा नवा हॉनर नोवा ३ स्मार्टफोन लॉन्च


स्मार्टफोन उत्पादक कंपनी हॉनरने आपला नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला असून इतर स्मार्टफोन्सना हा स्मार्टफोन चांगलीच टक्कर देत आहे. हॉनर नोवा ३ असे कंपनीच्या या स्मार्टफोनचे नाव आहे. अनेक चांगले फिचर्स कंपनीने या स्मार्टफोनमध्ये दिले आहेत आणि हा फोन रेडमी नोट ५ ला चांगलीच टक्कर देत आहे.

या फोनमध्ये ४जीबी रॅमसोबत ६४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. त्याचबरोबर १६ मेगापिक्सलचा रिअर आणि २४ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये KIRIN 659 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याची किंमत १८९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे.

Leave a Comment