
अमेरिकेच्या सीनेटमध्ये ‘केंब्रिज अॅनालिटिका’ डेटा लिक प्रकरणानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांना फेसबुकने उत्तरे दिली असून फेसबुकने यामध्ये, युजरची खासगी माहिती, त्याची आवड-निवड जाणून घेण्यासाठी त्याच्या कंम्प्युटरच्या की-बोर्ड आणि माऊसच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाते अशी कबुली दिली आहे.
फेसबुकची असते तुमच्या माऊस, की-बॉर्डच्या प्रत्येक हालचालीवर नजर
म्हणजे, फेसबुकला तुमचं फेसबुक कंम्प्युटरवर लॉग-इन असेल तर माऊसच्या प्रत्येक क्लिक आणि की-बोर्डच्या कोणत्या बटनाचा वापर तुम्ही करत आहात ही सर्व माहिती समजत असते. युजर कोणत्या प्रकारच्या गोष्टींवर जास्त वेळ घालवतो, कोणत्या कंटेंटवर किती वेळ थांबतो याची माहिती याद्वारे फेसबुक घेते. युजरला त्याद्वारेच जाहिराती दाखवल्या जातात. ही कबुली फेसबुककडून देण्यात आली आहे.
