देशातील ९९ टक्के जनतेला संपर्क क्षेत्रात आणण्याचे जिओचे ध्येय


येत्या आर्थिक वर्षात म्हणजे २०१८-१९ मध्ये भारतातील ९९ टक्के जनतेला नेटवर्कशी जोडण्याचे ध्येय रिलायंस जिओने ठेवले असल्याचे कंपनीच्या वार्षिक अहवालात नमूद केले गेले आहे. ३१ मार्च २०१८ ला जिओचे १८.६६ कोटी ग्राहक होते आणि प्रती व्यक्ती सरासरी व्यवस्य १३७ रु. प्रती महिना होता असेही या अहवालात म्हटले गेले आहे.

रिलायंस समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणले, नव्या पिढीच्या ग्राहक व्यवसायात देशव्यापी स्तरावर जिओ अग्रणी कंपनी बनली आहे. आमचा वृद्धी दर जगात सर्वश्रेष्ठ पातळीवर आहे. पहिल्याच वर्षी आम्ही नफा कमावला असून पहिल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत आमच्या फिचर फोनने बाजारातील १५ टक्के हिस्सा मिळविला आहे. यंदाच्या वर्षात भारतातील ९९ टक्के जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील.

Leave a Comment