जिओच्या सगळ्या ग्राहकांना मिळणार आता दररोज जादाचा १.५ जीबी डेटा


नवी दिल्ली : इतर टेलीकॉम कंपन्यांची रिलायंस जिओच्या आक्रमक प्रायसिंग स्ट्रॅटेजीने झोप उडवली असून पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओने ऑफर आणली आहे. एक नवा प्लान जिओने आणला असून त्याअंतर्गत जिओच्या सगळ्या ग्राहकांना आता १.५ जीबी जादाचा डेटा अजून मिळणार आहे. जिओ यूजरने जर कोणाताही प्लान घेतला तर त्याच्यासोबत १.५ जीबी डेटा म्हणजे एकूण ३ जीबी डेटा दररोज मिळणार आहे.

१४९ रुपये, ३४९ रुपये, ३९९ रुपये आणि ४४९ रुपयांचा प्लान जिओने आणला आहे. १.५ जीबी डेटा प्रतिदिनसह आता एकूण ३ जीबी डेटा रोज मिळणार आहे. सध्याच्या घडीला १९८ रुपये, ३९८ रुपये, ४४८ रुपये आणि ४९८ रुपयांच्या पॅकमध्ये एकूण २ जीबी डेटा प्रतिदिन भेटतो आहे. पण नव्या ऑफरनुसार आणखी १.५ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजे आता एकूण ३.५ जीबी डेटा मिळणार आहे. जिओच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३ जीबी डेटा रोज मिळतो पण आता १.५ जीबी अतिरिक्त डेटासह एकूण ४.५ जीबी डेटा रोज मिळणार आहे. ५०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १.५ जीबी अतिरिक्त डेटासह ५.५ जीबी डेटा रोज मिळणार आहे. तर ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५ जीबी डेटा प्रतिदिन मिळतो पण आता ६.५ जीबी डेटा रोज मिळणार आहे.

Leave a Comment