व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असलेली ‘डी-मार्ट’ची मोफत योजना फेक न्यूज


मागील दोन दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर डी-मार्ट १७व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना २५०० रुपयांची मोफत ‘शॉपिंग व्हाऊचर’ देण्यात असल्याची बातमी फिरत आहे. ‘डी-मार्ट इंडिया’ या संकेतस्थळाला यासाठी भेट देण्याचे आवाहन संदेशाच्या माध्यमातून केले जात आहे. पण ही फेक न्यूज असून अशी कोणतीही योजना डी-मार्टच्या वतीने सुरू करण्यात आली नसल्याचे लगेचच जाहीर करण्यात आले.

काही लोक लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अशा योजना सोशल मिडियावरून पसरवत आहेत. ‘डी-मार्ट’च्या नावाने यात ते कूपन्स विकत असतात. या साऱ्या कूपन्स बनावट असल्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे अशा फसव्या संदेशांच्या आधारे कोणत्याही योजनेला बळी पडू नये, असे आवाहन ‘डी-मार्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment