बजाजने बाईकर्सच्या भेटीला आणली नवी पल्सर


मुंबई: बजाजने पल्सर रियर डिस्क व्हेरियंट लॉन्च केल्यावर कंपनीने दोन महिन्यांच्या आतच आणखी एक बाईक बाईकर्सच्या भेटीला आणली आहे. ही बाईक एक क्लासिक एडिशन असून, याबाबत पुण्यातील एका शोरूमने दिलेल्या माहितीनुसार ६७,४३७ एवढी या एडिशनची किंमत आहे. रियर ड्रम ब्रेक व्हेरियंटपेक्षा सुमारे ६,६३७ रूपयांनी ही पल्सर स्वस्त आहे.

क्लासिक एडिशनमध्ये टँक एक्सटेन्शन आणि बॉडी ग्राफिक्स नाही. मोटारसायकलमध्ये ब्लॅक पेंट स्किम आहे. याशिवाय बाईकमध्ये फारसा बदल केलेला नाही. पल्सर क्लासिक १५० मध्ये रिअर डिस्क व्हेरियंटप्रमाणेच १४९ सीसी पॉवर एअर कूल्ड, सिंगल-सिलिंडर बीएसआईव्ही इंजिन आहे. त्याची मोटार ८००० आरपीएममध्ये १४पीएस आणि ६००० आरपीएममध्ये १३.४ एनएम टॉर्क देते.

बाईकला ब्रेकिंगसाठी २४० एमएम फ्रंट डिस्क आणि १३० एमएम रिअर ड्रम ब्रेक देण्यात आले असून बजाजला या स्वस्त व्हेरियंट्समुळे एण्ट्रील लेवल कम्यूटर सेगमेंटमध्ये मजबूत पकड मिळू शकते. होंडा यूनिकॉर्न १५० आणि हीरो एक्सट्री स्पॉर्ट तसेच, हिरो अचीवर या बाईकसोबत या बाईकची स्पर्धा असेल.

Leave a Comment