‘जॅक मा’ने का ठेवले आपल्या कंपनीचे नाव ‘अलीबाबा’ ?


आपल्या कंपनीचे काहीतरी हटके नाव ठेवण्याच्या प्रयत्नात प्रत्येक कंपनी करत असते. अनेकांचा कंपनीच्या नावात क्रिएटिव्हिटी असावी, असाच प्रयत्न असतो. आपल्या कंपनीचे क्षेत्र, काम, गुण, उद्देश वगैरे एका शब्दात स्पष्ट व्हावा, असा काहींचा मानस असतो. पण लोकप्रिय ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ कथेतील ‘अलीबाबा’चे नाव चीनमधील बलाढ्य ‘अलीबाबा’ने ठेवले आहे. पण असे नाव ठेवण्यामागे नेमका काय उद्देश असावा? तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामागचा उद्देश.

हिंदी आणि उर्दू भाषेत ‘अलीबाबा’ हा शब्द वापरला जातो. पण हा शब्द बहुतांश हिंदी भाषेतच वापरला. पण अलीबाबा हा शब्द मुळात हिंदीचा नसून, तो हिंदी भाषेत अरबी भाषेतून आला आहे. ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ या कथेमुळे आपल्या सगळ्यांना हा शब्द परिचित आहे.

याच कथेतून चीनमधील ‘अलीबाबा’ कंपनीला सुद्धा हे नाव घ्यावेसे वाटले. अर्थात, त्यामागची कहाणी नक्कीच ऐकण्याजोगी आहे. दस्तुरखुद्द ‘अलीबाबा’चे संस्थापक जॅक मा यांनी २००६ साली कंपनीच्या या नावामागे नक्की काय कथा आहे, हे सांगितले होते. आपल्या कंपनीसाठी सर्वांना आवडेल किंवा सर्वांना लगेच रिलेट होईल, असे नाव जॅक मा हे शोधत होते. आपल्या कंपनीचे नाव जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील माणसाला कंपनीचे नाव कळावे, असे जॅक मा यांना वाटत होते.

एकदा सॅनफ्रान्सिस्कोमधील कॉफी शॉपमध्ये जॅक मा हे बसले होते. त्यांनी तेव्हा तेथील एका वेट्रेसला विचारले, अलीबाबा शब्द तू कधी ऐकला आहेस का? किंवा हा शब्द उच्चारल्यानंतर तुझ्या मनात पहिले काय येते? वेट्रेसने खुल जा सिम-सिम, असे उत्तर दिले. जॅक मा यांनी त्यानंतर हाच प्रश्न आजूबाजूला असलेल्या जवळपास तीस लोकांना विचारला. जवळपास सगळ्याच जणांना अलीबाबा शब्द माहित होता. जॅक मा यांनी त्यावेळी ‘अलीबाबा’ शब्द कंपनीशी अंतिम केला.

जॅक मा अलीबाबा या पात्राबद्दल सांगतात, एक उदार, चाणाक्ष आणि लोकांसाठी चांगल्या हेतून काम करणारा अलीबाबा हा व्यापारी असल्यामुळे आपल्या कंपनीचा उद्देशही असाच काहीसा आहे. ‘अलीबाबा’ शब्दाचा उच्चार चीनमध्ये ‘अ-ली-बा-बा’ असा तुटक तुटकपणे केला जातो. पण जगभरातील लोकांना माहित असलेल्या कथेतील अलीबाबाला थेट कंपनीच्या नावात बसवून जॅक मा यांनी आपली कंपनीही जगप्रसिद्ध केली.

Leave a Comment