
मुंबई : एक धमाकेदार ऑफर रिलायन्स बिग टीव्हीने लॉन्च केली असून भारतीय युजर्ससाठी कंपनीने लॉन्च केलेला प्लान ऐकल्यावर तुम्हालाही आनंद होईल. कारण, एका वर्षासाठी सर्व चॅनल्स फ्री (मोफत) दाखवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
‘या’ तारखेपासून सुरु होणार Reliance DTHची बुकिंग; पाच वर्ष मोफत पहा चॅनल्स
डिजिटल इंडिया अंतर्गत कंपनीने पार्टनरशिप करताना डायरेक्ट टू होम सर्व्हिसनुसार जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे. यासाठी रिलायन्सने देशभरात ५० हजार पोस्ट ऑफिस सोबतच पार्टनरशिप केली असल्यामुळे ग्राहक सुरुवातीला बुकिंग पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून करु शकणार आहेत.
कंपनी या प्लानमध्ये ग्राहकांना ५ वर्षांसाठी ५०० फ्री-टू-एअर चॅनल्स अगदी मोफत दाखवणार आहे. तर, पेड चॅनल्स तुम्ही एका वर्षापर्यंत फ्री पाहू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला रिलायन्स बिग टीव्हीच्या सेट टॉप बॉक्सची प्री बुकिंग करावी लागणार आहे. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना एचडी HEVC सेट-टॉप बॉक्स देण्यात येणार आहे. या सेट-टॉप बॉक्स अंतर्गत ग्राहकांना रेकॉर्डिंग, यूएसबी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, रेकॉर्डिंग अँड व्यूइंग सारखे लेटेस्ट फिचर्स असणार आहेत. १ वर्षापर्यंत चॅनल्स फ्री असणार आहे आणि यामध्ये एचडी चॅनल्सचाही समावेश आहे.
या सर्व्हिससाठी कंपनीने प्री-बुकिंग २० जून पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि सिक्किम मधील युजर्स डीटीएचची प्री-बुकिंग करु शकणार आहेत. ग्राहक ही ऑफर पोस्ट ऑफिसमध्ये ४९९ रुपये जमा करुन मिळवू शकतात. तर, सेट-टॉप बॉक्स इंस्टॉलेशन दरम्यान १५०० रुपये द्यावे लागणार आहेत. लॉयल्टी बोनससाठी ग्राहकांना दुसऱ्या वर्षीपासून ३०० रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. असे दोन वर्षांपर्यंत करावे लागणार आहे. त्यानंतर सब्सक्रायबर्सला २ हजार रुपयांची लॉयल्टी बोनस मिळेल. म्हणजेच तुम्ही सुरुवातीला जमा केलेली रक्कम तुम्हाला पुन्हा मिळेल.
सेट-टॉप बॉक्ससाठी रिलायन्स बिग टीव्हीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्री-बुकिंग करु शकता. ग्राहकांना या प्री-बुकिंगसाठी ४९९ रुपये भरावे लागणार आहेत. तर, आऊटडोअर यूनिटसाठी १५०० रुपये द्यावे लागणार आहेत.
