भारतात लॉन्च झाली डुकाटी मॉन्सटर ७९७ प्लस


नवी दिल्ली : बाईक प्रेमींसाठी डूकाटी इंडियाने आपल्या मॉन्सटर फॅमिलीत आणखीन एक नवी बाईक लॉन्च केली असून कंपनीने डुकाटी मॉन्सटर रेंजच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त मॉन्सटर ७९७ या बाईकची नवी व्हेरिएंट बाईक मॉन्सटर ७९७ प्लस लॉन्च केली आहे.

भारतीय बाजारात डूकाटी मॉन्सटर ७९७ प्लस या गाडीची किंमत ८.०३ लाख रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटच्या समान ही किंमत असून फ्लाय स्क्रीन आणि पॅसेंजर सीट कव्हर ७९७ प्लस या बाईकमध्ये देण्यात आली आहे. दोघांचीही फिनिशिंग बाईकच्या बॉडी कलरनुसार देण्यात आली आहे.

तुमच्याकडे जर डूकाटी मॉन्सटर ७९७ असेल तर या अॅक्सेसरिज खरेदी करुन तुम्ही स्टँडर्ड मॉन्सटर ७९७ मध्ये फिट करु शकता. पण तुम्हाला त्यासाठी ३०,००० रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत.

बाईक प्रेमींना मॉन्सटर ७९७ प्लस स्टार व्हाईट सिल्क, डुकाटी रेड आणि डार्क स्टेल्थ कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. मॉन्सटर ७९७ गाडीत ८०३सीसी एल- ट्विन सिलिंडर इंजिन देण्यात आले असल्यामुळे ८२५० आरपीएमवर ७२एचपीची पावर आणि ५७५० आरपीएमवर ६९ एनएम टार्क जनरेट करते. गाडीला ट्रान्समिशनसाठी सिक्स स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Leave a Comment