पगारवाढ नाही तरीही मुकेश अंबानी आनंदी असण्यामागे हे कारण


यंदा पगारवाढ नाही म्हटल्यावर नाराज होणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्याला गेली १० वर्षे पगारवाढ न मिळूनही मुकेश अंबानी इतके आनंदी कसे याचे कोडे पडणे स्वाभाविक आहे. मात्र या कोड्याचे उत्तर ब्लुमबर्ग क्विंट चा अहवाल डोळ्याखालून घातला तर सहज समजू शकेल. बड्या उद्योगांच्या प्रमुखांनी वेतन मर्याद कशी ठरवून घ्यावी याचा आदर्श निर्माण करण्यासाठी गेली १० हे पगारवाढ न घेणारे उद्योजक म्हणून रिलायंस उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचे नाव सध्या चर्चेत आहे.

यावर ब्लुमबर्गचा अहवाल म्हणतो कि अंबानी यांनी १० वर्षे पगारवाढ घेतली नाही हे सत्य आहेच पण त्यांचा पगार त्यांना मिळणाऱ्या लाभांशाचा १ टक्का इतकाही नाही. रिलायंसचे सर्वाधिक शेअर त्यांच्या मालकीचे आहेत आणि २००८ ते २०१७ या काळात मुकेश अंबानी आणि परिवाराला एकूण शेअरच्या ३१६१६ कोटीच्या लाभांशापैकी १४५५३ कोटी लाभांश मिळाला आहे. मुकेश यांना मिळणारी लाभांशाची रक्कम त्याच्या वेतनाच्या १२० पट आहे. शिवाय स्वतः मुकेश आणि त्याच्या परिवारासाठी सुरक्षेवर होणारा खर्च त्याच्या वेतन भत्त्यात समाविष्ट नाही. मुकेश अंबानी यांना पगारवाढ न मिळतही ते आनंदी असण्यामागे हे कारण आहे.