चीनला मागे टाकून अमेरिकेने बनविला जगातील वेगवान संगणक


सुपर कॉम्प्यूटर बनविण्यात चीनने घेतलेली आघाडी मोडून काढताना अमेरिकेने जगातील सर्वाधिक वेगवान संगणक बनविला असून हा संगणक सर्वसामान्य संगणकांच्या तुलनेत लाखोपट वेगवान आहे. समिट नावाने हा संगणक बनविला गेला असल्याचे शुक्रवारी अमेरिकेच्या उर्जा विभागाने जाहीर केले आहे. या संगणकाने २०० पेटाफ्लॉपचा पिक परफोर्मंस दिला असुन २०० क्वाड्रीलीयन गणना प्रती सेकण्ड वेगाने तो करू शकतो.

आत्तापर्यंत चीनचा सनवे तायहुलाईट जगातील सर्वाधिक वेगवान सुपर कॉम्पुटर होता. अमेरिकेने बनविलेला समिट सुपरकॉम्पुटर त्याच्यापेक्षा ३० पट वेगवान आहे. गेली अनेक वर्षे या कॉम्पुटरवर काम सुरु होते. यात हजारो चिप्सचा वापर केला गेला असून ४६०८ सर्व्हर आहेत. त्याचा आकार दोन टेनिस कोर्ट इतका असून तो थंड राखण्यासाठी दर मिनिटाला ४ हजार गॅलन पाणी लागते.

या संगणकाचा वापर संशोधक, मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क, आर्टीफीशियल इंटेलिजन्स, कॅन्सर संशोधन, मानवी प्रोटीन अध्ययनासाठी केला जाणार आहे.

Leave a Comment