भारतातील हा आहे वयोवृद्ध वृक्ष – वय अवघे १४०० वर्षे


छत्तीसगडचा कोरबा भागातील बाल्को वनक्षेत्रात वनविभागाला देशातील सर्वात जुना वृक्ष आढळला असून साल जातीच्या या झाडाचे वय १४०० वर्षे असल्याचे परीक्षणात सिद्ध झाले आहे. वैज्ञानिकाने या वृक्षाच्या आतील रिंगची तपासणी करून त्याचे वय निश्चित केले गेले आहे. हा वृक्ष जगातील सर्वात जुन्या वृक्षातील एक असेल असे सांगितले जात आहे. स्थानिक लोक आणि आदिवासी या महावृक्षाला देव मानतात.

जगात १ हजार वर्षापेक्षा अधिक वय असलेले वृक्ष हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच आहेत. वृक्षांचे वय ठरविण्याची एक पद्धत असते. यात वृक्षाच्या खोडावर दिसणाऱ्या रिंग मोजल्या जातात. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ टकसन मधील लॅबॉरेटरी ऑफ ट्री रिंग रिसर्च संस्था हे काम करते. या संस्थेने जगातील सर्वात जुना म्हणून व्हाईट माउंट ग्रेट बेसिन मधील ब्रिसलकोण पाईन वृक्षाची नोंद केली असून त्याचे वय ५०६७ वर्षे निश्चित केले आहे. दुसऱ्या नंबरवर चिली मधील पाईन वृक्ष असून त्याचे वय ३६४७ वर्षे निश्चित केले गेले आहे. तीन नंबरवर सध्या १०७५ वर्षे जुना बोस्नियन पाईन वृक्ष असून त्याची जागा आपला साल वृक्ष घेईल असे सांगितले जात आहे. हा वृक्ष २८ मीटर उंच असून त्याच्या खोडाची जाडी २८ इंच आहे.

Leave a Comment