गाटा लुपस पार करताना भुताला द्यावे लागते पाणी, सिगरेट


हिमाचल प्रदेशचा मनाली पासून लेहला जाण्यासाठी खडतर रस्ता मार्ग पार करावा लागतो हे खरे पण देशातील हा सर्वात धोकादायक रस्ता निसर्गाच्या विविध रूपांचे दर्शन घडविणारा असल्याने आयुष्यात एकदा तरी हि मार्गक्रमानं करायला हवी. या रस्त्यात लागणारी २१ अतिधोकादायक वळणे गाटा लुपस नावाने ओळखली जातात. याच रस्त्यावर एका भुताचे वास्तव्य असून रस्त्यातून जाताना त्याला सिगरेट, पाणी बाटल्या अर्पण केल्या जातात. यामुळे प्रवास सुखरूप पार पडतो अशी भावना आहे.

या मागची कथा अशी आहे कि १७ हजार फुट उंचीवर अतिउंच पहाडाच्या मार्गावर हि २१ अतिअवघड हेअरपिन बेंडस आहेत. याच रस्त्यात एके ठिकाणी भुताचे छोटे घर असून त्यासमोर सिगरेट पाकिटे, मिनरल वॉटर तसेच कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या वाहिलेल्या दिसतात. असे सांगतात कि १० वर्षापूर्वी एक ट्रक या मार्गावरून जात असताना अचानक बर्फवृष्टी सुरु झाली आणि ट्रक बिघडला. तेव्हा ड्रायव्हर मदत आणण्यासाठी जवळच्या गावात गेला व क्लीनर ट्रकजवळ थांबला. मात्र बर्फवृष्टी इतकी वाढली कि ७ दिवस रस्ता बंद राहिला. त्यानंतर जेव्हा ट्रकड्रायव्हर परतला तेव्हा क्लीनरचा मृत्यू झाल्याचे त्याला दिसले. त्याने तेथेच क्लीनरवर अंत्यसंस्कार केले.


या प्रसंगानंतर विचित्र घटना घडू लागल्या. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना एक माणूस दिसे. तो त्यांच्याकडे पाणी आणि अन्न मागत असे आणि ते दिले गेले नाही तर या वाहनाला अपघात होई. या प्रकारची चर्चा संपूर्ण हिमाचल राज्यात सुरु झाली तेव्हा एक जागा निश्चित करून तेथे भुताचे घर बांधले गेले आणि तेथे पाणी, सिगरेट ठेवले जाऊ लागले. नवल म्हणजे त्यानंतर हे भूत दिसेनासे झाले.

Leave a Comment