सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले निकेश अरोडा


मुंबई : भारताचे निकेश अरोडा हे टेक्नॉलॉजीच्या दुनियेत सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले आहेत. निकेश अरोडा यांनी या आधी सॉफ्ट बँक आणि गूगलसोबत काम केले आहे. ते आता पाला अल्टो नेटवर्कचे नवे सीईओ आहेत. अरोडा यांचा याठिकाणी वार्षिक पगार रूपये १२.८ कोटी डॉलर असणार आहे. हा पगार भारतीय चलनात ८५७ कोटी रूपये असणार आहे.

जेवढा वार्षिक पगार निकेश यांना मिळणार आहे, तेवढाच त्यांचा वार्षिक बोनस देखील असणार आहे, त्यांना सोबत २६८ कोटी रूपयांचे शेअर्स मिळतील, पण ते शेअर्स त्यांना ७ वर्षांनतर विकता येणार नाहीत. निकेश जर पालो अल्टोच्या शेअर्सची किंमत ७ वर्षात ३०० टक्के वाढवण्यात ते यशस्वी झाले, तर त्यांना ४४२ कोटी रूपये आणखी मिळतील.

एवढ्या पगारावर निकेश यांना घेण्याच्या निर्णयाने अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. क्रेडिट स्विसचे चिकित्सक ब्रॅड जेलनिक यातील एक आहेत. फायनॅन्सिएल टाईम्सशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, सायबर सिक्युरिटीचा त्यांना अनुभव नाही. पण दुसरीकडे असे देखील म्हटले जात आहे की, निकेश यांच्याकडे क्लाऊड आणि डेटा डीलिंगचा फार मोठा अनुभव आहे. सायबर सिक्युरीटी डेटा सध्या अॅनलिसिसमध्ये वाईट प्रकारे गुंतलेला आहे.

निकेश यांनी बिझनेस स्टॅडर्डला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, अनेक कंपन्यांनी त्यांना नोकरी देण्यास नकार दिला होता. ते अमेरिकेला जाताना घरातून ३ हजार डॉलर घेऊन निघाले होते. त्यांना या पैशांवरच दिवस काढावे लागले होते. भारत आणि इंडोनेशियाने इंटरनेटमध्ये गुंतवणूक केल्याचे श्रेय निकेश यांना दिले जाते. निकेश यांच्या या ज्ञानाच्या आधारावरच त्यांना सॉफ्ट बँकच्या बोर्डावर देखील सामावून घेण्यात आले.

Leave a Comment